

No Tree Should Be Cut Orders NGT to Nashik Civic Body
Esakal
नाशिक, ता. १२ गेल्या महिनाभरापासून राज्यभर गाजत असलेल्या तपोवनातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली असून लवादाने तीन सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. समितीकडे महापालिकेला तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी महापालिका व वृक्षप्राधिकरणाला म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार आता पुढील सुनावणी १५ जानेवारीला पार पडेल.