water level
sakal
नाशिक: जिल्ह्यात सहा महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या भूजल पातळीत तब्बल ६.८ मीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे दुष्काळग्रस्त आणि सर्वाधिक पाऊस असलेल्या तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात वाढ झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भेडसावणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.