Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित
Bribery Allegations Against Nashik GST Superintendent : हरिप्रकाश शर्मा यांना उद्योजकाकडून ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पुणे येथील सीबीआय पथकाने पाच लाख रुपये स्वीकारताना अटक केली. या गंभीर आरोपांनंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक: उद्योजकाकडून ५० लाखांची लाच मागत २२ लाखांत तडजोड करून पाच लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या बँक खाते व मालमत्तेची चौकशी सुरू आहे.