‘युवारंग’ महोत्सवात जीटीपी महाविद्यालयाचा डंका

‘युवारंग’ महोत्सवात जीटीपी महाविद्यालयाचा डंका
Published on: 
फोटो : NSK26H34204 नंदुरबार : युवारंग महोत्सवात विजेता ठरलेला जीटीपी महाविद्यालयाचा संघ. ----------------- ‘युवारंग’ महोत्सवात ‘जीटीपी’चा डंका सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे नुकत्याच पार पडलेल्या ‘युवारंग’ महोत्सवात येथील जीटीपी महाविद्यालयाने सात पदके प्राप्त करत सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. महाविद्यालयाचा संघ जिल्हानिहाय फिरता चषकाचा मानकरी ठरला आहे. युवारंग महोत्सवात महाविद्यालयाला पाच सुवर्णपदके, एक रौप्यपदक व एक कांस्यपदक मिळाले. स्पर्धेमध्ये आदर्श रामेश्वर संघपाळ या विद्यार्थ्याला क्ले मॉडेलिंग आणि कोलाज कला प्रकारात सुवर्णपदक, किरण दोहऱ्या वसावे या विद्यार्थ्याला पोस्टर मेकिंग कलाप्रकारात सुवर्णपदक, राहीन शेख या विद्यार्थ्याला कार्टून कला प्रकारात कांस्यपदक मिळाले. दिव्यांग महोत्सवात सुनंदा पावरा या विद्यार्थिनीला कार्टूनिंग कला प्रकारात सुवर्णपदक तर क्ले मॉडलिंग कला प्रकारात रौप्यपदक मिळाले. उज्वल पाडवी या विद्यार्थ्याला स्पॉट पेंटिंग कला प्रकारात सुवर्णपदक मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग समन्वयक तथा संघ व्यवस्थापक प्रा.जितेंद्र पाटील, महिला संघ व्यवस्थापिका प्रा. डॉ. संगीता पिंपरे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. रुपेश देवरे, प्रा. पुनम बागूल आणि सांस्कृतिक विभाग समितीसह महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही जबाबदारी पार पडली. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी आदींनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.