Dada Bhuse on Uddhav Thackeray : शिंदे गटात नाराजी?, दादा भुसे यांनी तीन शब्दांमध्ये दिलं उत्तर

Dada Bhuse Statement About Uddhav Thackeray
Dada Bhuse Statement About Uddhav Thackerayesakal

Dada Bhuse on Uddhav Thackeray : ठाकरे गटातर्फे नागपूर येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते नागपूर लागलेले कलंक असे म्हटले.

यावरून भाजपा नेत्यांकडून ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे. यात आता नाशिकचे पालकमंत्री व शिंदे गटाचे दादा भुसे यांनी, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही.

त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेली टीका महाराष्ट्रातील नागरिकांना आवडलेली नसल्याची टीका ठाकरे यांचे नाव न घेता केली. (Guardian Minister Bhuse criticized Thackeray maharashtra politics nashik)

‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी पालकमंत्री बोलत होते.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील बहुतांशी आमदारांनी पाठ फिरविली. याबाबत पालकमंत्र्यांकडे विचारणा केली असता, काही कामानिमित्ताने काही आमदारांना बैठकीला उपस्थित राहणे शक्य झालेले नाही.

परंतु सदरचा कार्यक्रम सर्वांचा असल्याने तो यशस्वी करणे ही सामूहीक जबाबदारी आहे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, मंत्री मंडळाचा विस्तार होत नसल्याने शिंदे गटात नाराजी असल्याबाबत विचारले असता, पालकमंत्री भुसे म्हणाले, तसे काहीही नाही.

मंत्रिमंडळ विस्ताराअभावी कामे थांबलेली नाहीत. तसेच, राष्ट्रवादीच्या समावेशामुळे आमच्या कोणतीही नाराजी नाही. लवकरच खातेवाटपही होणार असल्याचेही स्पष्ट केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dada Bhuse Statement About Uddhav Thackeray
Maharashtra Politics : त्या 12 आमदारांच्या नियुक्तीत 'मोदी' घालणार बिब्बा? जाणून घ्या आत्तापर्यंत काय-काय झालं

तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा

राष्ट्रवादीतील अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने नाशिकच्या पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याच्या चर्चेबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी, पालकमंत्री बदलासंदर्भातील सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे.

त्यांच्या आदेश आला तर त्याची अंमलबजावणी होईल. परंतु, पालकमंत्री बदलाची कोणतीही चर्चा सध्यातरी नसल्याचे सांगितले. दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमात तीनही पक्षाचे नेते येणार असल्याने साहजिक पदाधिकारी-कार्यकर्ते आपआपल्या पक्षाच्या झेंडे शहरात लावतीलच, असेही यावेळी पालकमंत्री भुसे यांनी सांगितले

Dada Bhuse Statement About Uddhav Thackeray
Maharashtra Politics : त्या 12 आमदारांच्या नियुक्तीत 'मोदी' घालणार बिब्बा? जाणून घ्या आत्तापर्यंत काय-काय झालं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com