पर्यावरणीय इको झोनचे सीमांकन करणार : पालकमंत्री भुजबळ

पर्यावरणीय इको झोनचे सीमांकन करणार : पालकमंत्री भुजबळ
Updated on
Summary

अनेक पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे संवेदनशील डोंगर फोडून दगड, विटा, मुरूम यांची तस्करी सुरू आहे.

नाशिक : इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात डोंगर भुईसपाट करून अवैध काम होत असल्याने हे प्रकार रोखण्यासाठी पर्यावरणीय इको सेन्सेटिव झोनचे (environmental eco zone) सीमांकन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (guardian minister chhagan bhujbal) यांनी दिली. (guardian minister chhagan bhujbal said that demarcation of environmental eco zone will be done)

पर्यावरणीय इको झोनचे सीमांकन करणार : पालकमंत्री भुजबळ
म्युकरमायकोसिसचा वीस वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक!

त्र्यंबकेश्‍वर हा पश्चिम इको झोनमधील परिसर असून, २०१३ पासून या भागातील डोंगरांचे बेसुमार उत्‍खनन सुरू आहे. अनेक पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाचे संवेदनशील डोंगर फोडून दगड, विटा, मुरूम यांची तस्करी सुरू आहे. महसूल विभागाने दंड आकारणीच्या कारवाया केल्याचे दाखवायचे नंतर महसूल यंत्रणेतील विविध लवादात पुन्हा या कारवाया शिथिल करीत ‘जैसे थे’ सूर ठेवायचे, असा फंडा या भागात रुजला आहे. ‘सकाळ’ने वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्र्यंबकेश्‍वर पालिकेतील झोन बदलाच्या नावाखाली पर्यावरणीय डोंगर फोडण्याच्या प्रकारात नगराध्यक्षाला पायउतार व्हावे लागले.

पर्यावरणीय इको झोनचे सीमांकन करणार : पालकमंत्री भुजबळ
नाशिक ‘रेड झोन' बाहेर; लॉकडाउन निर्बंधाबाबत फेरविचार

दरम्यान, सध्याही राज्यातील १३ जिल्ह्यांतून वाहणाऱ्या जीवनदायिनी गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्‍वरला ब्रह्मगिरीला भुईसपाट करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याविषयी पालकमंत्री भुजबळ आणि जिल्हाधिकारी शनिवारी (ता. २९) प्रथमच जाहीरपणे बोलले. ब्रह्मगिरी कोरण्याच्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दीड कोटींचा दंड आकारला आहे. त्यासोबत इको सेन्सेटिव झोनमध्ये समावेश होणाऱ्या परिसराचे सीमांकन करण्यात येणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले. (guardian minister chhagan bhujbal said that demarcation of environmental eco zone will be done)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com