Guardian Minister Dada Bhuse while inaugurating the park which was realized from the concept of former corporator (self) Surekhatai Bhosale.
Guardian Minister Dada Bhuse while inaugurating the park which was realized from the concept of former corporator (self) Surekhatai Bhosale.esakal

Nashik News : गोदाघाटाचे सौंदर्य, पावित्र्य जपणे नाशिककरांचे कर्तव्य : पालकमंत्री दादा भुसे

गोदाघाट हा नाशिकचे वैभव आहे. या घाटाचे सौंदर्य व पावित्र्य जपणे हे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
Published on

नाशिक : करोडो रुपये खर्च करून प्रकल्प उभे राहतात, मात्र ते टिकले पाहिजेत. याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे. गोदाघाट हा नाशिकचे वैभव आहे. या घाटाचे सौंदर्य व पावित्र्य जपणे हे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका व स्मार्टसिटी कंपनीने अहिल्यादेवी होळकर पुलालगत रविवार पेठेच्या बाजूने असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे उद्‌घाटन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. (Guardian Minister Dada Bhuse statement Duty of Nashik to preserve beauty and sanctity of Goda Ghat Nashik News)

या वेळी आमदार देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, सचिन भोसले, रश्मी भोसले, मामा ठाकरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे म्हणाले, गोदाघाटाच्या परिसरातील सौंदर्यात भर टाकण्याचे काम धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानामुळे होणार आहे. नाशिक शहरात २०१६ पासून स्मार्टसिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू झाली आहे.

जवळपास १ हजार कोटींचे विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामुळे नाशिक शहराचा कायापालट होणार आहे. स्मार्टसिटीच्या माध्यमातून गोदा सौंदर्यीकरण, एलईडी पथदीप, स्मार्ट स्कूल यासारखे जवळपास १५ प्रकल्पांचे काम सुरू आहे.

Guardian Minister Dada Bhuse while inaugurating the park which was realized from the concept of former corporator (self) Surekhatai Bhosale.
Nashik Maratha Survey : सिन्नर तालुक्यात 15,571 कुणबी नोंदी! 31 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश

आपले सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असून यातून जनतेचे हित साधले जात आहे. गोदा सौंदर्यीकरण या प्रकल्पांतर्गत विविध विकासकामे सुरू आहे. गोदा पार्क गोदावरी व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यान ही कामे पूर्ण झाली आहे.

गोदा पार्कमध्ये विविध देशी झाडे लावण्यात आली आहे. गोदा पार्कपासून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले उद्यानापर्यंत नौकाविहार करण्यासाठी जेट्टी उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांसाठी बसण्यासाठी बेसॉल्ट दगडाचे बेंचेस व ३६० मीटरचा नदीकिनारी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे.

गंगावाडी येथे बेसॉल्ट दगड बसवण्यात आले आहे. सदर कामांची अंदाजे किंमत पंधरा कोटी रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे सुरू असताना नागरिकांनी असे प्रकल्प जपले पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री भुसे यांनी या वेळी व्यक्त केली.

Guardian Minister Dada Bhuse while inaugurating the park which was realized from the concept of former corporator (self) Surekhatai Bhosale.
Nashik: जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्‍या ‘मायाजाल’चे प्रयोग! कालिदास कलामंदिरात शनिवार, रविवारी मेजवानी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com