Dada Bhuse
sakal
नाशिक: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (ता. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा केली. त्यास अनुषंगून जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाविषयी चर्चा झाली का, असा प्रश्न शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विचारला असता त्यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिले. ‘नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल’ अशा मार्मिक शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.