नाशिक: जिल्ह्याला गेल्या आठ महिन्यांपासून पालकमंत्र्यांची प्रतीक्षा असताना चालू वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारणचा निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे विकासकामे रखडली आहेत. निधीअभावी प्रामुख्याने वीज, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधांवर परिणाम होत असल्याने जिल्हावासीयांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.