Nashik Crime : गुड्डू मुस्लिमचे नाशिक कनेक्शन अफवाच! दिल्ली पोलिसांकडून शस्त्रास्त्र प्रकरणी वेटरची चौकशी

atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connection
atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connectionesakal

Nashik Crime News : उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या गुन्हेगारी घडामोडीचा थेट संबंध नाशिकशी जोडला जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

उमेश पाल हत्याकांडातील फरारी संशयित व कुख्यात गुंड गुड्डू मुस्लिम यास नाशिकमधून अटक करण्यात आल्याच्या वृत्ताचे नाशिक पोलिस आयुक्तालयाने इन्कार केला आहे. (Guddu Muslim Nashik Connection Rumor Waiters investigation by Delhi Police in arms case Nashik Crime news)

‘दोन दिवसांपूर्वी झालेल्या असद एन्काउंटर वा गुड्डू मुस्लिम याचा नाशिकशी काहीही संबंध नाही. त्यामुळे यासंदर्भात कोणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिस आर्मॲक्टच्या गुन्ह्यासंदर्भातील तपासाकामी नाशिकमध्ये आल्यानेच या प्रकरणाविषयी संशय निर्माण झाला. प्रत्यक्षात एका हॉटेलमधील वेटरची चौकशी करून दिल्ली पोलिस परत गेले. त्याचा गुड्डू मुस्लिम प्रकरणाशी काहीएक संबंध नसल्याचेही नाशिक पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील झांशी येथे उमेश पाल हत्याकांडातील संशयित असद अहमद व गुलाम यूपी एटीएसच्या पथकाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. या घटनेला दोन दिवस होत नाही तोच प्रयागराज येथे शनिवारी (ता. १५) रात्री कुख्यात गुंड व माजी खासदार अतिक अहमद व त्याच्या भावाचा तिघांनी विदेशी पिस्तुलीतून गोळ्या झाडून हत्या केली.

या घटनेने उत्तर प्रदेशच नव्हे, तर देश हादरला आहे. तर दुसरीकडे प्रसार माध्यमातून या प्रकरणांशी संबंधित फरारी असलेला संशयित गुड्डू मुस्लिम हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिकमध्ये लपून असल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. रविवारी (ता. १६) गुड्डूला नाशिकमधून यूपी एटीएसने अटक केल्याच्या वृत्ताने नाशिकही हादरले.

प्रत्यक्षात, दिल्ली पोलिसांचे एक पथक आर्मॲक्ट गुन्ह्याच्या तपासाकामी नाशिकला आले आणि माघारी गेलेही. मात्र, उत्तर प्रदेशातील घटना आणि नाशिकमध्ये आलेले दिल्ली पोलिस, यामुळे पराचा कावळा केला गेला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connection
Crime News : मुलाचे भांडण सोडवायला गेलेल्या आईच्या डोक्यात घातला दगड

गुड्डू मुस्लिमच्या अटकेचे वृत्त नाशिक पोलिस आयुक्तालयाने फेटाळून लावले आहे. दोन दिवसांपूर्वीच याबाबत स्पष्ट केल्यानंतरही रविवारी सकाळपासून गुड्डू संदर्भातील वृत्त सुरू होते. याबाबत पुन्हा पोलिस आयुक्तालयाने स्पष्टपणे इन्कार केला आहे.

दिल्ली पोलिस येऊन गेले

दिल्लीतील एका आर्मॲक्टसंदर्भातील गुन्ह्याच्या तपासाकामी दिल्ली पोलिस शनिवारी (ता. १५) रात्री नाशिकमध्ये आले होते. या संदर्भात अंबड पोलिसांच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी अंबड परिसरातील एका हॉटेलमध्ये वेटर असलेल्या शिवानंद दिवाकर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अंबड पोलिस ठाण्यात कसून चौकशी केल्यानंतर त्यास पुन्हा हॉटेलमध्ये सोडून देण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिस माघारी परतली आहेत. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशाच्या एटीएसचे कोणतेही पथक नाशिकमध्ये आलेले नसल्याचे पोलिस आयुक्तालयातर्फे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

"गुड्डू मुस्लिमचे नाशिकशी कनेक्शनबाबत कोणतीही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांकडून देण्यात आलेली नाही वा त्याबाबत कोणतीही गोपनीय माहिती विचारण्यात आलेली नाही. हे केवळ प्रसारमाध्यमांमधून समोर येते आहे. दिल्ली पोलिस एका गुन्ह्यात नाशिकला आले, बहुदा त्यामुळेही संशय निर्माण झाला असावा. प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातील घडामोडीचा अद्यापतरी नाशिकशी कोणतेही कनेक्शन नाही."- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक

atiq ahmed and brother ashraf ahmed killed in prayagraj asad ahmed encounter guddu muslim nashik connection
Crime News : भररस्त्यात विवाहितेच्या विनयभंगाचा प्रयत्न; 'कारमध्ये बस' म्हणत शिवीगाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com