Gudhi Padwa Festival : आनंदाची गुढी...! स्वागत यात्रेने नववर्षाचे स्वागत! शोभायात्रेने सांगता

Women performing swords demonstrations during the New Year Swagat Yatra.
Women performing swords demonstrations during the New Year Swagat Yatra. esakal

नाशिक : नाशिक महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने चैत्र शुद्ध प्रतिपदा श्री शालिवाहन शके १९४५, शोभन संवत्सरारंभ म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष या मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी श्री साक्षी गणपती मंदिर, भद्रकाली कारंजा, श्री काळाराम मंदिर, पूर्व दरवाजा आणि रामवाडी परिसरातील कौशल्यानगर या तीन ठिकाणावरून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. या तीनही यात्रांचा समारोप गोदाघाटावरील पाडवा पटांगण येथे झाला. (Gudhi Padwa Festival Welcoming marathi New Year with Swagat Yatra nashik news)

शहराच्या विविध भागातून पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली गेली. यात सकाळी ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात व मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते गुढीपूजन पार पडले. या वेळी प्रफुल्ल संचेती, योगेश गर्गे, जयंत गायधनी व राजेश दरगोडे, गिरीश निकम उपस्थित होते.

त्यानंतर पारंपरिक ढोल पथकांचे वादन सुरू झाले. शौर्य प्रात्यक्षिके, कराटे प्रात्यक्षिके, मंगळागौर खेळ, महिलांची बाईक रॅली, भजनी मंडळ, लेझीम पथक, तलवार पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब आणि मर्दानी खेळांचे पथक सहभागी झाले होते.

स्वागत यात्रांना नाशिककरांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गुढीपाडव्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच, ठिकठिकाणी स्वागत यात्रांचे जल्ल्लोषात स्वागत झाले.

नियोजनासाठी वृषाली घोलप, सुचेता भानुवंशे, प्रदीप भानुवंशे, मोहन गायधनी, प्रतीक शुक्ल, अश्विनी चंद्रात्रे, प्रियांका लोहिते, केतकी चंद्रात्रे, मंदार कावळे, केदार शिंगणे, बापू दापसे, शेखर जोशी, कौस्तुभ अष्टपुत्रे, शिवम बेळे, शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, महेश महंकाळे, प्रसाद गर्भे यांनी विशेष मेहनत घेतली.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Women performing swords demonstrations during the New Year Swagat Yatra.
Gudhi Padwa Celebration: बॉलीवूडनंही दणक्यात साजरा केला गुढीपाडवा..

एकूणच १८ मार्च ते २१ मार्च दरम्यान पाडवा पटांगणावर महावादन, अंतर्नाद, महारांगोळी, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आणि सादरीकरण आदी कार्यक्रम झाले. या सर्व कार्यक्रमांना नाशिककरांनी मोठ्या उपस्थितीत दाद दिली.

गोदाघाट दुमदुमला

सर्व स्वागत यात्रा गंगाघाटावर पोचल्यावर पाडवा पटांगणासह संपूर्ण गोदाघाट दुमदुमून गेला. शोभायात्रेत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. सर्वत्र भगवे वातावरण होते, ढोल ताशांच्या गजरात फेटेधारी युवती व महिला लक्षवेधी ठरल्या.

Women performing swords demonstrations during the New Year Swagat Yatra.
Gudhi Padwa: मराठी मालिकांमधील 'या' अभिनेत्रींनी थाटात साजरी केला गुढीपाडवा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com