नाशिक- ग्रामीण भागात टंचाईची दाहकता जाणवत असताना रोजगारासाठी मजुरांची पावले ‘मनरेगा’च्या कामांकडे वळत आहेत. जिल्ह्यात ‘मनरेगा’च्या माध्यमातून २३ हजार ८९९ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला. पेठ-सुरगाणा, त्र्यंबकेश्वर यांसारख्या सीमावर्ती तालुक्यातील कामांवर गुजरातचे मजूर उपस्थिती लावत आहेत. पण, जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.