esakal | Nashik : जिल्ह्यातील ४३ मंडळांमध्ये अतिवृष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : जिल्ह्यातील ४३ मंडळांमध्ये अतिवृष्टी

Nashik : जिल्ह्यातील ४३ मंडळांमध्ये अतिवृष्टी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गुलाब चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तीन दिवसांपासून संततधार सुरु आहे. गेल्या चोवीस तास जिल्ह्यातील ४३ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तीन दिवसांच्या संततधारेनंतर जिल्ह्यातील धरणं ९० टक्के भरले असून, गंगापूर व दारणा-गिरणासह प्रमुख धरण समूहांतून विसर्ग सुरु आहे.

जिल्ह्यातील २३ धरणांपैकी केवळ भोजापूर, ओझरखेड, तिसगाव हेच धरण भरायचे राहिले आहे. गेल्या चोवीस तासातील पावसात कळवण, देवळा आणि सिन्नर या तीन तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी झाली. साधारण ६५ मि.मी.पेक्षा आधिक पाउस झालेल्या भागातील पाउस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यातील ४३ मंडळात असा पाऊस झाला. चोवीस तासात त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात- ९२, कळवण- ४०, देवळा- ४७.३, येवला- १०५, इगतपुरी- १०९, पेठ- १३२, सिन्नर- २३, मालेगाव- ६५, नांदगाव- ७९, चांदवड- ४३, निफाड- ४०, नाशिक तालुक्यात ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नाशिक- ६९.१, इगतपुरी- १०९, धारगाव- ११५, त्र्यंबकेश्‍वर- ९२, वेळूंजे- १३०, हरसूल- १५०, कसबे वणी- ६६, कोशिंबे- ८२, ननाशी- १४७, पेठ- १३२, जोगमोडी- ११४, कोहोर- १२५, लासलगाव- १३६, देवगाव- १२५, रानवड- ६९, वडनेर भैरव- ६९, येवला- १०५, अंदरसूल- ९१, नगरसूल- १०५, पाटोदा- ११५, सावरगाव- १३६, जळगाव नेउर- १३०, नांदगाव- ७९, मनमाड- ८०, हिसवळ- ८७, जातेगाव- १४७, वेहळगाव- ८२, मालेगाव- ६५, करंजगव्हाण- ६९, झोडगे- ७०, सौंदाणे- ८०, निमगाव- ९१, कौळाणे- ९०, जळगाव निं.- ९०, डांगसौंदाणे- ६५, मुल्हेर- ९२, ताहाराबाद- ८३, जायखेडा- ७८, सुरगाणा- १२०, बाऱ्हे- ८८.५, मनखेड- ८०.२, उंबरठाण- ८६.१, बोरगाव- १०५.

loading image
go to top