
Gunaratna Sadavarte: अॅड. गुणरत्न सदावर्ते हे वारंवार आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत येत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत ते म्हणजे एका व्हायरल ऑडिओ क्लीपमुळं. या ऑडिओ क्लीपमध्ये मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं सदावर्ते यांना धमकी दिल्याचं ऐकायला मिळत आहे. तसंच सदावर्ते यांनी देखील त्याला प्रत्युत्तर देताना इशारा दिला आहे.