
Deenanath Mangeshkar Hospital Row: तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या राजीनाम्याची नेमकी कारणं काय आहेत? हे आज पत्रकार परिषद घेऊन रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनी स्पष्ट केली. डॉ. घैसास यांना सध्या झोपही लागत नाही, तसंच इतर कारणंही त्यांनी वाचून दाखवली.