Pravin Gedam
sakal
नाशिक: नवी मुंबईतील खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी ‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांतून सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीत प्रवासासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या.