Nashik Crime News : जायखेडा पोलिसांनी कारवाईत जप्त केला 30 लाखांचा गुटखा!

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi, Sub-Inspector Tushar Bhadane, Navnath Rasal, Sunil Patil of Crime Branch, etc. while seizing Gutka worth Rs.
Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi, Sub-Inspector Tushar Bhadane, Navnath Rasal, Sunil Patil of Crime Branch, etc. while seizing Gutka worth Rs.esakal

नामपूर (जि. नाशिक) : गुटखाबंदी असतानाही गुजरात राज्यातून विविध मार्गाने गुटख्याची खरेदी- विक्री होत असल्याची गुप्त माहिती जायखेडा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चार ठिकाणी छापे टाकून सुमारे ३० लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा पडकला. याप्रकरणी जायखेडा पोलिसात चार गुन्हे विविध कलमान्वये दाखल करण्यात आले आहे. (Gutkha worth 30 lakhs was seized by jaykheda police nashik Latest Crime News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi, Sub-Inspector Tushar Bhadane, Navnath Rasal, Sunil Patil of Crime Branch, etc. while seizing Gutka worth Rs.
Nashik Crime News : कांदा पिकावर अज्ञाताकडून फवारणी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये दिलीप वसंत जगताप (रा. लेंढाणे, ता. मालेगाव), विशाल प्रभाकर रौंदळ (रा. लेंढाणे, ता. मालेगाव), सतीश देवराम वडक (रा. लेंढाणे, ता. मालेगाव), सचिन भालचंद्र नेर (रा. लाडुद, ता. बागलाण), हर्षद संजय गोसावी (रा. आव्हाटी, ता. बागलाण), नितीन रमेश अहिरे (रा. अंतापूर, ता. बागलाण) आदींचा समावेश असून, पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात त्यांना अटक केली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, नवनाथ रसाळ, हवालदार सुनील पाटील, भोये, नाईक भगरे, क्षीरसागर, भामरे आदींचा समावेश होता. या कारवाईप्रसंगी अन्नसुरक्षा अधिकारी गोपाळ कासारही उपस्थित होते.

Assistant Police Inspector Shrikrishna Pardhi, Sub-Inspector Tushar Bhadane, Navnath Rasal, Sunil Patil of Crime Branch, etc. while seizing Gutka worth Rs.
Dhule Crime News : निजामपूर, जैताणेत थेट 51 वीजचोरांवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com