Dilip Khairnar showing the damage to onion crop in Tisgaon Shivara last year no.115.
Dilip Khairnar showing the damage to onion crop in Tisgaon Shivara last year no.115.esakal

Nashik Crime News : कांदा पिकावर अज्ञाताकडून फवारणी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सौंदाणे (जि. नाशिक) : सौंदाणे व परिसरात शेतकऱ्यावर अस्मानी संकटाचे ढग डोळ्यासमोर उभे आहेत. अशात सौंदाणे येथील एका शेतकरी कुटुंबावर सुलतानी संकटाचे ढग तयार झाले असून या अल्पभूधारक खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. येथील रहिवासी दिलीप खैरनार यांची तिसगाव (ता. देवळा ) महसुली शिवारातील शेतात कांदा पिकाची लागवड केली होती. परंतु, अज्ञाताने औषध फवारणी करून कांदा पिकाचे मोठे नुकसान केले आहे. (Onion crop sprayed by unknown person Big loss to farmer Nashik Crime News)

येथील रहिवासी दिलीप खैरनार यांची तिसगाव शिवारात गट नं.११५ मध्ये दिलीप खैरनार यांनी अडीच ते तीन महिन्यापूर्वी कांदा या पिकाची लागवड केली होती. परंतु, एक दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने त्या कांदापिकावर औषध फवारणी करून कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली.

जोमाने उभे असलेले कांदा पिकाची पात अचानक पिवळी पडलेली दिसताना खैरनार यांच्या लक्षात आले. प्रत्यक्ष पाहणी केल्यावर असा विकृतपणा केलेले त्यांना दिसून आले. व हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक शेतकरी व कृषी विभाग यांच्या माहितीवरून गहू पिकावरील तन नाशकाची फवारणी करून हा अनुचित प्रकार झालेला दिसत आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Dilip Khairnar showing the damage to onion crop in Tisgaon Shivara last year no.115.
Nashik Crime News : दुचाकी चोरट्याला 3 महिन्यांचा कारावास

असे स्थानिकांचे म्हणणे आहे. चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करून तसेच, वातावरणाचा सामना करून या पिकाचे जतन केले होते. काढणी आलेल्या या तोंडी घासाचे नुकसान झाल्याने खैरनार कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकावर तन नाशक फवारणी केले असल्याने कांदा मुळासह जमिनीतून बाहेर निघत आहे.

कांदा सोंगनी करताना कांदा खाली राहून कांदा पातीचे टोप हातात येत आहे. तलाठी तिसगाव, कृषी सहायक तिसगाव, तालुका पोलिस स्टेशन देवळा यांनी स्थानिक पंचनामा केला आहे. देवळा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dilip Khairnar showing the damage to onion crop in Tisgaon Shivara last year no.115.
Nashik Crime News : अवैध कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका; साडे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com