Gyandeep Gurukul Ashram Case : अत्याचार प्रकरणातील हर्षलच्या वृंदावननगरातील घराचा पंचनामा

Harshal More of Pragati Society here used to make drones and the house sealed by the police.
Harshal More of Pragati Society here used to make drones and the house sealed by the police.esakal

पंचवटी (जि. नाशिक) : ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित हर्षल मोरेवर आता लहान मुलांकडून द्रोण बनवून शोषण केल्याप्रकरणी आडगाव पोलिसात वेठबिगारी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

द्रोण बनविण्यात येत असलेल्या घराला धर्मदाय आयुक्तांनी केलेले सील पंचनाम्यासाठी काढण्यात आले. दोन पंचांच्या देखरेखीखाली या घरांचा पंचनामा झाला व द्रोण बनविण्याचे काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. (Gyandeep Gurukul Ashram Case Panchnama of Harshal house in Vrindavannagar in torture case Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Harshal More of Pragati Society here used to make drones and the house sealed by the police.
Nashik ZP News : कामांना मान्यतेसाठी झेडपीत लगिनघाई; 973 कोटींच्या कामांना चालना

म्हसरूळ शिवारातील द किंग फाऊंडेशन संचालित ज्ञानपीठ गुरुकुल वसतिगृहात हर्षल ऊर्फ सोनू मोरे याने मागील वर्षी द्रोण बनविण्याचे मशीन घेतले होते. हे मशीन त्याने जत्रा हॉटेल, वृंदावननगर येथील प्रगती सोसायटीतील घरात ठेवले होते. वसतिगृहातील मुलेही शाळेतून आल्यानंतर यातील सहा ते सात अल्पवयीन मुलांना या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून द्रोण तयार करून घेत असे.

बाल सुरक्षा कायदा अंतर्गत मुलांची काळजी व संरक्षण यानुसार वेठबिगारी व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये ॲट्रॉसिटीचा गुन्हा आडगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सील केलेल्या घराचा पंचनामा बाकी होता. दरम्यान पंचवटीतील काही स्वीटच्या दुकानांवर व द्रोण विक्रेते व्यावसायिकांना अल्पवयीन मुलांमार्फत द्रोण विकले जात होते. याबाबत सुरगाणा येथील १६ वर्षीय मुलाने फिर्याद दिल्याप्रमाणे मोरेवर वेठबिगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. उर्वरित मुलांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

Harshal More of Pragati Society here used to make drones and the house sealed by the police.
Nashik News : सप्तशृंगगडावर 42 कुंडांचे अस्तित्व!; पथकाकडून शोध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com