27573
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत
ज्ञानेश्वरी आव्हाडला कांस्यपदक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकलहरे येथील मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटरची प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी आव्हाड हिने कांस्यपदक पटकाविले.
१२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत सांगलीत ''वन स्टेट, वन स्टेज'' संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्य बॉक्सिंग असोसिएशन आणि सर्जेराव यादव प्रतिष्ठान, ईश्वरपूर व एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेत राज्यभरातील युवा बॉक्सर्सनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेत ज्ञानेश्वरीने ५७ ते ६० किलो वजन गटात कांस्यपदकावर नाव कोरले. स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी नाशिक जिल्ह्यातील पहिली महिला बॉक्सर होण्याचा मानही तिने मिळविला आहे. वाघोली येथे झालेल्या विभागीय स्पर्धेतही विजय मिळवून तिने सांगली येथे आयोजित अखिल महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा (१९ वर्षांखालील) बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र झाली होती.
अभियांत्रिकी विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी. डी. आहिरे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ज्ञानेश्वरीच्या यशाबद्दल मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किशोर दराडे, सचिव कुणाल दराडे, संचालक डॉ. जी. के. खराटे यांनी तिच्या या यशाबद्दल अभिनंदन केले.