चांदोरी- गोदाकाठच्या चांदोरी, सायखेडा, करंजगाव, शिंगवे, भेंडाळी, चाटोरी या भागांतील शेतकऱ्यांना मंगळवारी (ता.६) दुपारी अवकाळी गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. दुपारी तीनच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारा आणि पावसामुळे गाजर, भाजीपाला, ऊस, तसेच कांद्याच्या उशिरा लागवडीला मोठा फटका बसला आहे.