Tejas Fighter Jet
sakal
नाशिक: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक लढाऊ तेजस विमानामुळे हवाई दलाला नवीन बळ लाभले. ‘तेजस’ची निर्मिती करणारे ‘एचएएल’ हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. या निर्मितीने भारताने आत्मनिर्भरतेकडे महत्त्वाचे पाऊल टाकले, असे कौतुकोद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले.