Indian Air Force
sakal
नाशिक: स्वदेशी ‘तेजस एमके १ए’ या लढाऊ विमानाने शुक्रवारी (ता. १७) ओझरच्या आकाशात पहिली यशस्वी झेप घेतली. भारतीय हवाई दलाची ताकद असलेल्या सुखोई-एसयू-३० एमके आणि एचटीटी-४० या विमानांनी तेजसला पायलटिंग करून सलामी दिली. ओझरच्या हवाई क्षेत्रात या तिन्ही विमानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.