मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हातगाड्या बनल्या गुन्हेगारीचा अड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime news

मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या हातगाड्या बनल्या गुन्हेगारीचा अड्डा

पंचवटी (जि. नाशिक) : शहराच्या सर्वच भागांत वर्दीतील काहींच्या आशीर्वादाने मध्यरात्रीपर्यंत खाद्यपदार्थांच्या हातगाड्या (Handcarts) सुरू असतात. याठिकाणी मद्यपी (drunkers), गुन्हेगारांचा (Criminals) मोठा वावर असतो. यावर नियंत्रण ठेवल्यास जत्रा चौफुलीवर झालेल्या हल्ल्याच्या घटना टाळता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, परवाच्या घटनेनंतर पोलिसांनी सर्वच हातगाड्यांवर बंदी आणण्याच्या कृतीचे मात्र या भागातील सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे. (Handcart that run until midnight become den of crime Nashik News)

मागील आठवड्यात जत्रा चौफुलीवरील एका हातगाडीवर अंडा रोल घेण्यास गेलेल्या अजिंक्य लभडे या युवकाने ऑर्डर लवकर देण्याच्या मागणी केली असता, संबंधितांत सुरवातीला वादावादी व त्यानंतर हाणामारी झाली.

त्यानंतर चालकाने अजिंक्यच्या डोक्यात थेट दगड टाकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचले तरी अलीकडे घडणाऱ्या अशा घटनांमुळे गुन्हेगारीचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येतो. कधीकाळी कोणाला चापट मारण्यास घाबरणारी तरुणाई आता थेट जीवघेणा हल्ला करत असल्याने अशा घटना पोलिसांसह समाजालाही अंतर्मुख करणाऱ्या ठरत आहेत. दुसरीकडे कायद्याच्या रक्षकांच्याच घरात गुन्हेगार तयार होऊ लागल्याचे चित्रही काळजी वाढविणारे आहे.

हेही वाचा: अपघातात 3 जण ठार, ठेकेदारासह चालकावर गुन्हा दाखल करायची मागणी

पोलिसांच्या कृतीचे स्वागत

या घटनेनंतर पोलिसांनी या चौफुलीवर हातगाड्या लावण्यास बंदी केल्याचे स्वागत परिसरातील रहिवाशांनी केले आहे. मात्र केवळ येथेच नव्हे तर शहराच्या सर्वच भागात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र, याचा फटका दिवसभर चारचाकीवर खाद्यपदार्थांची विक्री करून कुटुंब चालविणाऱ्या अनेकांना बसला आहे. कुलवंत सरंगल पोलिस आयुक्तपदी असताना त्यांनी उशिरापर्यंत चालणाऱ्या व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम बंद झाली, मात्र शहरातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर उशिरापर्यंत व्यवसाय करणाऱ्यांवर उचित कारवाई झाल्यास गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसू शकतो.

हेही वाचा: कळवणला साकारतोय अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक; 22 कोटी रुपये मंजूर

नियमित गस्तही गरजेची

अंडाभुर्जी, रोल विकणाऱ्या अनेक चालकाकडे मद्य पिण्यासाठी ग्लाससह सर्व व्यवस्था होत असल्याने अनेकजण याठिकाणीच मद्यप्राशन करतात, त्यातून वादावादी व थेट खुनाच्या घटना घडत टाळायच्या असतील तर कायद्याची चाड असणाऱ्या पोलिसांची नियमित गस्तही गरजेची आहे. अन्यथा असा घटना घडतच राहणार, अशी बोलकी प्रतिक्रिया प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या अनेकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Handcart That Run Until Midnight Become Den Of Crime Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikcrimepanchavati
go to top