Hanuman Janmotsav 2023 : एक हजार भाविकांकडून हनुमान चालिसा पठण! संपूर्ण परिसर भक्तिमय

Drone photo of Hanuman Chalisa reading ritual
Drone photo of Hanuman Chalisa reading ritualesakal

Nashik Hanuman Janmotsav 2023 : हनुमान जयंतीनिमित्त जुने नाशिक चव्हाटा भागात जयंतीच्या पूर्वसंध्येला हनुमान चालिसा पठन करण्यात आले. सुमारे १ हजार १०० भाविकांनी सामुदायिक पठण केले.

या भागात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा धार्मिक कार्यक्रम झाला. पोलिसांकडून चारही बाजूने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Hanuman Chalisa recited by thousand devotees Whole Premises Devotional Hanuman Janmotsav 2023 nashik news)

सकल हिंदू समाज जुने नाशिक यांच्यातर्फे चव्हाटा परिसरात हनुमान जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला बुधवार (ता. ५) सामुदायिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले होते. दोन तास शांततेत कार्यक्रम झाला.

लहान मुले, तरुण, ज्येष्ठ, महिला अशा सुमारे सुमारे १ हजार १०० भाविकांकडून हनुमान चालिसा पठन करण्यात आले. इस्कॉन मंदिरातील भजनी पथक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

उपस्थित सर्वजण भजनामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत नासामध्ये संशोधनाचे काम केलेले शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी यांनी हनुमान चालिसाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व समजावून सांगितले.

दरम्यान, धार्मिक विधी झाले. छपरीची तालीम संघाचे ज्येष्ठ पहिलवान यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर आरती करून कार्यक्रमाची सांगता झाली. छपरीची तालीम संघाचे विशेष सहकार्य लाभले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Drone photo of Hanuman Chalisa reading ritual
Hanuman Jayanti 2023 : एकमुखाने बोला.. बोला जय जय हनुमान..! दर्शन पूजन, भंडाऱ्याने जन्मोत्सव साजरा

या वेळी सदानंद दासजी, पंचवटी येथील पंचमुखी देवस्थानाचे महंत भक्तिचरणदास महाराज, नाथ संप्रदायाचे आश्विननाथ महाराज आदी उपस्थित होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत ठिकठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

ड्रोन कॅमेऱ्याचा वापर

हनुमान चालिसा पठणाचा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात जुने नाशिक परिसरात कार्यक्रम झाला. कार्यक्रमादरम्यान कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेत पोलिसांकडून प्रत्येक क्षणाची माहिती संकलित केली जात होती. त्यासाठी पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण तसेच छायाचित्र ड्रोनद्वारे टिपण्यात आले.

Drone photo of Hanuman Chalisa reading ritual
Hanuman Jayanti 2023 : धुळ्यात ‘जय हनुमान’चा जयघोष!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com