लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा सोशल मिडियावर वर्षाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding wishes on Social media

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा सोशल मिडियावर वर्षाव

जुनी शेमळी (जि. नाशिक) : अलिकडे लग्न वाढदिवसाला (Wedding Anniversary) महत्व दिले जात आहे. त्यासाठी सोशल मीडियावर (Social media) शुभेच्छांचा जणू वर्षाव केला जात आहे. तरूण पिढीकडून या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले जात असून, फोटोग्राफीलाही प्राधान्य दिले जात आहे. (Happy wedding anniversary trending on social media Nashik News)

ज्या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस आहे व लग्नानंतरच्या फिरण्याच्या आठवणी कौटुंबिक जीवन जगत असताना फोटो एकत्र केले जातात. विविध अॅपच्या सहाय्याने या फोटोंना डिजिटल व हायटेक बनवून त्यात विविध प्रकारची गाणी टाकून व्हिडिओ बनवले जातात. दुसऱ्या दिवशी लग्नाचा वाढदिवस राहिल्यास आदल्या दिवशीच फोटो, व्हिडिओ मित्र- मैत्रिण, नातेवाईकांना पाठवले जातात. रात्रीच सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्यानंतर नातलग, मित्र परिवाराकडून जोडप्यांना शुभेच्छा दिल्या जातात.

हेही वाचा: Nashik : टरबुजावरील फळ माशीचा आंबा फळावर प्रादुर्भाव

"पूर्वी सोशल मिडिया नसल्यामुळे लग्न वाढदिवस ही संकल्पना नव्हती. कधी लग्नाची तारीख माहिती नाही. परंतु, मुले, मुली, सुना, नातवंडे सोशल मीडियामुळे एकत्र येऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करतात. हा आनंद सर्व कुटुंबाला मिळतो."

- राहुल शेलार, शेतकरी, जुनी शेमळी

"लग्नाचा वाढदिवस आज सोशल मीडियावर इव्हेंट झाला आहे. यामुळे पती- पत्नीमधील स्नेह, आपुलकी वाढते. सोशल मीडियामुळे मिळणाऱ्या शुभेच्छा जीवनातील दुःख विसरून एक नवी उमेदीची चालना मिळते. " - नितीन भामरे, शिक्षक, चिंचकसाड

हेही वाचा: कैरीपासून कोचरी बनविण्यासाठी आदिवासींची लगबग

Web Title: Happy Wedding Anniversary Trending On Social Media Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top