नाशिक: देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (ता. १३) ते शुक्रवार (ता. १५) या काळात राष्ट्रध्वजासोबत सेल्फी अपलोड करता येणार आहे. यंदा ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता; स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या घोषवाक्यासह अभियान साजरे केले जात असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.