Latest Marathi News | पत्नीचा छळ; पतीला दोन वर्षाची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : पत्नीचा छळ; पतीला दोन वर्षाची शिक्षा

नाशिक : पत्नीला उपाशी ठेवून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली. हा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट आठचे न्यायाधीश प्रतिभा पाटील यांच्या कोर्टात चालला.

राकेश कैलास गायकवाड (रा. आपला महाराष्ट्र कॉलनी, हिरावाडी रोड), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. गायकवाड यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पती राकेश गायकवाड, सासरे कैलास गायकवाड व सासू शशिकला गायकवाड यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Harassment of wife Husband sentenced to two years Nashik Crime News)

हेही वाचा: Nashik : जिल्हा परिषद समाज कल्याणच्या 15 कोटींच्या निधी खर्चाचा मार्ग खुला

२८ एप्रिल २०१५ ते २०१९ या काळात आरोपीसह संशयितांनी किरकोळ कारणातून उपाशीपोटी ठेवून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक उमा गवळी यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

सरकारतर्फे अ‍ॅड. जी. आर. बोरसे यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांची साक्ष व तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपी पतीस दोन वर्ष साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

हेही वाचा: Nashik : संपर्क कार्यालयावरून राष्ट्रवादी, शिंदे गट आमनेसामने; कार्यालय 1 फलक मात्र 2