येवला- संघर्ष हा शब्द कधीच जवळ ठेवू नका, तो नकारात्मक शब्द आहे. कष्ट आणि मेहनतीची तयारी ठेवली, की महिलांना आकाश कवेत घेणे सोपे आहे, याची जाणीव ठेवा. महाराष्ट्रात अनेक सामाजिक चळवळी कार्यरत आहेत. या चळवळीमुळेच महिलांना आपापल्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी बळ मिळत आहे. येथील कुणाल दराडे फाउंडेशनचे महिलांसाठीचे कार्य हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने केले.