Winter Temperature : थंडीचा कडाका कायम! जिल्ह्याचे तापमान 10.2 अंश सेल्सिअसपर्यत

Temperature
Temperatureesakal
Updated on

नाशिक : थर्टी फर्स्टची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे शहरात थंडीचा कडकाही वाढला आहे. सोमवारी (ता. २६) पहाटेच्या सुमारास अचानकपणे थंडीचा कडाका वाढला. शहराचे किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, शहर व जिल्हावासीय गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. (harshness of cold continues Winter temperature of district up to 10 degrees Celsius nashik news)

शहर आणि जिल्ह्यात शनिवारपासून (ता.१०) तापमानात वाढ होऊन ३० अंश सेल्सिअस नोंदविले जात होते. यामुळे नाशिकककरांना थंडीचा कडाका जाणवत नव्हता. किमान तापमान दोन आठवड्यांत उच्चांकी १९.९ अंशांपर्यंत वाढले होते. यामुळे शहर जिल्ह्यातून थंडी पूर्णपणे गायब झाली होती. मात्र, शनिवारपासून थंडी पुन्हा परतली असून, किमान तापमानाचा पारा ९.८ अंशांपर्यंत खाली घसरला होता.

राज्याच्या उत्तरेकडील भागाच्या किमान तापमानात घट झाल्याने गारठा वाढला आहे. निफाड, नाशिक, धुळे येथे पारा १० अंशांच्या खाली आला आहे. रविवारी असलेला थंडीचा कडका सोमवारीही कायम होता. सकाळपासूनच हवेत गारवा जाणवत होता. सायंकाळी हवेत आणखीच गारवा वाढला होता.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Temperature
Nashik News : जायखेड्यातील जवानाचा आसाममध्ये मृत्यू

त्यामुळे नाशिककर गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना दिसत होते. थंडीच्या कडाक्यात अचानक वाढ झाल्याने गोदाकाठाबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागात रात्री व पहाटे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. थंडी वाढल्याने, रात्रीचा रस्त्यावरील शुकशुकाट देखील वाढला आहे. दुसरीडे अचानक थंडीत वाढ झाल्याने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.

रब्बी हंगामाला फायदा

संपूर्ण जिल्हयात थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने थंडीचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे. रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच भाजीपाला पिकालाही फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Temperature
Nashik News :...अन् चक्क गुलमोहराच्या झाडातून निघू लागलं पाणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com