student protest
sakal
येवला: राजापूर येथील हवालदार वस्ती शाळेत चार वर्ग व एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने मंगळवारी (ता.१८) पालकांसह विद्यार्थ्यांनी पंचायत समितीतच येऊन शाळा भरवली. या ठिकाणी जेवणाचे डबे खात शिक्षक द्या शिक्षक अशी घोषणाबाजी या विद्यार्थ्यांनी करत अनोखे आंदोलन केले.