esakal | दहा दिवसांसाठी बांधकामे बंद; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय

बोलून बातमी शोधा

 construction
दहा दिवसांसाठी बांधकामे बंद; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग अधिकच वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे, तर व्यापारी संघटनांनीदेखील जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील जबाबदार घटक म्हणून बांधकाम व्यावसायिकांच्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने २१ एप्रिल ते १ मे २०२१ पर्यंत बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लहान-मोठ्या बिल्डर्स कॉन्ट्रॅक्टर्स यांनी आपली साइट्स व इतर कामे २१ एप्रिल ते १ मे २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचे आव्हान बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने (बीएआय) नाशिक शाखेचे अध्यक्ष अभय चोकसी यांनी यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची स्थिती चिंता वाढवणारी आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरची खुल्या बाजारात विक्री; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

वाढत्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. शासन-प्रशासन, पोलिस व आरोग्यसेवा देणारे सर्वच जणांवर ताण पडत आहे. रुग्णांना सेवा देणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत यंत्रणेवर पडणारा ताण कसा कमी करता येईल, हे पाहणे आपले कर्तव्य आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बांधकाम व्यावसायिक आपली साइट्स बंद ठेवणार आहेत, अशी माहिती अभय चौकसी, सचिव विजय बाविस्कर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील आदींनी दिली.