Nashik News : केसपेपरवरील जातीचा रकाना हटविण्याचे आरोग्य आयुक्तांचे आदेश; अंनिसकडून स्वागत

राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना
Case Paper
Case Paperesakal

Nashik News : राज्यभरातील जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढताना त्या असलेल्या एका रकान्यात जातीचा उल्लेख करावा लागत असे. यासंदर्भात अंधश्रदधा निर्मूलन समितीने उघडकीस आणून तो जातीचा रकाना हटविण्याची मागणी केली होती.

याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आवाज उठविला होता. त्याची गंभीर दखल घेत केसपेपरवरील जातीचा उल्लेख असलेला रकाना वगळावा, असे आदेश आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या या आदेशाचे स्वागत करीत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (Health Commissioner order to remove caste from case paper Welcome from anti superstition committee Nashik News)

शासकीय रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना नाममात्र दरात केसपेपर काढावा लागतो. त्यावेळी या केसपेपरवरील एका रकान्यात जातीचा उल्लेख करावा लागत होता.

सदरची बाब नाशिकच्या अंनिसतर्फे उघड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रभर याची चर्चा झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्याविरोधात टीका केली होती.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य संघटना व प्रसार माध्यमांनी निषेध करून त्याविरोधात आवाज उठविला होता. जात पाहून उपचार करणार का, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अखेर या लढ्याला यश आले आहे.

आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांच्याकडे यासंदर्भात अहवाल मागितला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Case Paper
LIVE Marathi News Updates: निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नितीश कुमार

सदरील अहवाल अभ्यासल्यानंतर आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांनी राज्यातील सर्व सरकारी आरोग्य यंत्रणांच्या प्रमुखांना आदेश काढत केसपेपरवरील जातीचा रकाना हटविण्याच्या सूचना केल्या आहेत.

यापुढे केसपेपरवर जात, जमात किंवा पोटजात यांची नोंद न करता रुग्णांची माहिती अनुचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग या सामाजिक प्रवर्गानुसार नोंदविण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

"जिल्हा शासकीय रुग्णालयात केसपेपर बघितला असता त्यावर जातीचा रकाना दिसल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली व आरोग्य मंत्र्यांना निवेदन पाठविले. आता केसपेपरवरील जातीचा उल्लेख हटविणार असल्याने त्याचे समाधान आहे."

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस.

Case Paper
Narhari Zirwal : आमदार अपात्रतेचा मी घेतलेला निर्णय योग्य : नरहरी झिरवाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com