Nashik News : बापू गांधीनगरचे रहिवासी भोगताय नरकयातना!

Sewerage entering the commercial areas of Bapu Gandhi Nagar.
Sewerage entering the commercial areas of Bapu Gandhi Nagar.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील आझादनगर परिसरातील बापू गांधी नगरातील रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत असल्याचे चित्र आहे. गल्लीत, घराबाहेर पाय काढताच त्यांना रस्त्यावरील एक फुटा इतक्या सांडपाण्यातून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर गटारीच्या पाण्यामुळे नागरिक हतबल झाले आहे. या भागात अनेक नागरिकाच्या घरात गटारीचे पाणी शिरते. त्यामुळे बहुसंख्य घरात साथरोगांचे रुग्ण ठाण मांडून आहेत. येथील रहिवासी व प्रामुख्याने मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (health of residents and especially children at risk of malegaon due to sewage water on street nashik news)

गांधी कपडा मार्केट राज्यात प्रसिद्ध आहे. येथील बापू गांधी नगर भागाची दयनीय अवस्था झाली आहे. येथील नाल्यावर महानगरपालिकेतर्फे व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे. त्यामुळे गटारीच्या पाण्याच्या निचरा होत नाही. चार महिन्यापासून गटारीच्या पाण्याची समस्या वाढली आहे. महानगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही येथील समस्यांचे निराकरण होत नाही. गांधी नगर मेन रोड ते चार नंबर गल्लीपर्यत सर्वत्र गटारीचे पाणी साचतो.

नळाला पाणी आले की या भागात गटारीच्या पाण्याचा पातळीत वाढ होते. या समस्येकडे महानगरपालिका प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करते. सांडपाण्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. आजारपणासाठी खर्च होणारी रक्कम ही या विभागातील रहिवाशांच्या जणू काही अंगवळणी पडली आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Sewerage entering the commercial areas of Bapu Gandhi Nagar.
Nashik Crime News : दुचाकी चोरट्याला 3 महिन्यांचा कारावास

विशेष म्हणजे काही प्रमुख गल्ल्यांमध्ये महत्वाची दुकाने, बेकरी, मशीद, खाद्यपदार्थ विक्रेते, मेडीकल विक्रेत आहेत. त्यांच्या व्यवसायावरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. या भागातील गटारीच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी न लावल्यास परिसरातील नागरिक आंदोलन छेडतील, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

घरोघरी सर्दावा

बापू गांधी नगरातील असंख्य गल्लीतील घरांमधील भिंतीत पाणी मुरल्याने घरोघरी सर्दावा असतो. घरांच्या चोहो बाजूंच्या भिंती दोन ते तीन फुटापर्यंत सतत ओल्या असतात. यामुळे रंगरंगोटी, दुरूस्तीचा खर्चही नियमितपणे सुरु असतो. सर्दावा व ओलसरपणामुळे सर्दी, खोकला, कफ, दमा आदी आजार येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर आहेत. या भागातील रहिवाशांना घराबाहेर पडायचे म्हटले की अंगावर काटा येतो.

Sewerage entering the commercial areas of Bapu Gandhi Nagar.
Nashik Crime News : कांदा पिकावर अज्ञाताकडून फवारणी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com