आरोग्यवर्धक कवठाची झाडे बहरली; नागरीकांना भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kavtha

आरोग्यवर्धक कवठाची झाडे बहरली; नागरीकांना भुरळ

sakal_logo
By
प्रमोद सावंत

येसगाव (नाशिक) : दुर्मिळ होत चाललेल्या आरोग्यवर्धक कवठाची झाडे बहरली असून, अनेकांना ही फळे भुरळ घालत आहे. येसगाव परिसरात झाडाला लगडलेली कवठे अनेकांचे आकर्षण ठरत आहे.

शेताच्या बांधावर, डोंगर, उतारावर, रस्त्याच्या कडेला हे दुर्मिळ झालेले झाड दिसून येते. हे कोरडवाहू काटक असे फळझाड आहे. झाडाची उंची साधारणता सात ते नऊ मीटर असते. बियांपासून उगवलेल्या झाडाला सहा ते सात वर्षांनी फळे लागण्यास सुरवात होते. कलम पद्धतही यशस्वी होते. काही ठिकाणी हे झाड उंच तर; काही ठिकाणी गोलाकार वाढलेले दिसते. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून सव्वा दोनशे ते अडीचशेपर्यंत फळे मिळतात. साधारणता फळांचा हंगाम दसऱ्यापासून सुरु होतो. एका फळाचे वजन सरासरी दोनशे ग्रॅमपासून पुढे असते. आरोग्यवर्धक अशा पिकलेल्या चविष्ट फळांचा मृदू गर, आंबट, गोड, तुरट लागतो. लांबट बिया असतात. गराचा रंग विटकरी असून, फळाची साल कठीण, करड्या व भुरकट रंगाची असतात. पानांना सुगंध असतो. पानांची भाजीही बनवतात. पानांमध्ये ‘बी’ जीवनसत्त्व व फायबर असते. फळांचा गर गुळाबरोबर खातात. हंगामात फळांचा आस्वाद ग्रामीण भागात जास्त घेतला जातो. या फळापासून जेली, मुरंबा, बर्फी, चटणी आदी पदार्थ व सरबत तयार केले जाते. फळांमध्ये प्रथिने, खनिजे, पिष्टमय घटक, लोह, कॅल्शियम, ‘क’ जीवनसत्व आदि पौष्टिक मूलद्रव्य असतात.

हेही वाचा: नाट्य अभिनेते, निर्मात्यांना चांगले दिवस यावे : भरत जाधव

फळ खाल्ल्याचे फायदे

बीटा कॅरोटीनचा स्त्रोत, भूक वाढवविण्यासाठी मदत, मळमळ-उलटी बंद करते. मूळव्याध, अपचन, अमांश, अतिसार वर गुणकारी, रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. हे उत्तेजक फळ असल्याचे तज्ज्ञांचे असे मत आहे.

हेही वाचा: मालेगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर; हिंसाचारप्रकरणी ५ गुन्हे दाखल

loading image
go to top