मालेगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर; हिंसाचारप्रकरणी ५ गुन्हे दाखल

Life in Malegaon resumed on Friday night after the bandh took a violent turn
Life in Malegaon resumed on Friday night after the bandh took a violent turnSakal

मालेगाव (जि.नाशिक) : त्रिपुरात मुस्लीम समाजाविरोधात झालेल्या कथित घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी (ता. १२) हिंसक वळण लागल्यानंतर शुक्रवारी (ता. १२) रात्री आठपासूनच शहरातील जनजीवन पुर्वपदावर आले. पूर्व - पश्‍चिम भागातील सर्व व्यवसाय सुरळीत सुरु होते. हिंसाचारप्रकरणी चारशे ते पाचशे जणांच्या जमावाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तीन, तर आयेशानगर पोलिस ठाण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेतले असून, दहा जणांना अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे.

शहरातील हिंसाचाराचे वृत्त समजताच कृषिमंत्री दादा भुसे नाशिकहून तातडीने येथे दाखल झाले. शहरातील परिस्थितीची रात्रीच त्यांनी माहिती घेतली. श्री. भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख आदींसह शहरातील प्रमुख मान्यवरांची नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर - पाटील, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. बैठकीत प्रमुख नेत्यांनी दोषींवर कठोर कारवाई करावी, निरपराध तरुणांना यात अडकवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराचाही सर्वांनी निषेध केला. भुसे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच नागरिकांनी शांततेसाठी सहकार्य करावे. अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करताना शहराचा नावलौकिक जपावा, असे सांगितले.

हिंसाचारात किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या वाढली आहे. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या प्रकरणानंतर शुक्रवारी रात्रीतून व शनिवारी दिवसभरात पोलिसांनी सोळा जणांना ताब्यात घेतले. व्हिडिओ चित्रीकरण, साक्षीदार व घटनास्थळी असलेल्या पोलिसांकडून प्रत्यक्ष माहिती घेतल्यानंतर १० जणांना अटक करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. अपर अधिक्षक खांडवी, श्रीमती दोंदे यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली. ते कौतुकास पात्र असल्याचे श्री. शेखर, श्री. पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. घटनेचे चित्रीकरण व फुटेज पाहिल्यानंतर काही समाजकंटकांनी अल्पवयीन मुलांना प्रोत्साहन देऊन दगडफेक केल्याचे निदर्शनास येते. अटक केलेल्यांमध्ये दोन सराईत गुन्हेगार आहेत. आगामी काळात विना प्रिस्क्रीपशन अल्प्राझोलम (कुत्ता गोळी) विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Life in Malegaon resumed on Friday night after the bandh took a violent turn
नाशिक : कंगना विरोधात दाखल होणार देशद्रोहा गुन्हा

शहरातील हिंसाचारप्रकरणी आयेशानगर व शहर पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंसाचार प्रकरणातील ५६ जणांची ओळख पटली आहे. संशयितांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला स्पेशल स्कॉड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांसह सहा पथक करण्यात आले आहेत. सर्व माहिती, चित्रीकरण, फुटेज, सीसीटीव्ही, प्रत्यक्ष साक्षीदार याची खात्री झाल्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येत आहे. कोणत्याही निरपराधाला अटक करणार नाही. त्याचवेळी दोषींना पोलिस सोडणार नाहीत.
- बी. जी. शेखर - पाटील, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र

शहरात झालेल्या हिंसाचार व घटना दुर्दैवी आहेत. बंदची हाक देणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी निवेदन देऊन घरी परतले होते. काही टवाळखोरांनी हिंसक प्रकार केला. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी. मात्र, निरपराधांची धरपकड करु नये. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. पोलिसांची संख्या वाढवावी.
- मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, आमदार, मालेगाव मध्य

शहरातील हिंसक घटनांची सर्वंकष चौकशी करावी. दिवसभर शांततापूर्ण बंद असताना दोन धर्मात अराजकता निर्माण करण्यासाठी काहींनी हा प्रयत्न केला तर नाही ना, याबाबतही चौकशी व्हावी. आगामी महापालिका व काही राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्यातील वातावरण दुषीत करण्याचा हा प्रयत्न तर नव्हता ना, याकडे लक्ष द्यावे. सहारा हॉस्पिटल व शिवाजी पुतळ्यापुढील जुन्या महामार्गावर हिंसाचार करणाऱ्यांमध्ये कोण-कोण होते, त्याची सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शहानिशा करावी. दोषींवर कारवाई करताना निर्दोष लोकांवर कारवाई झाल्यास विरोध करु.
- आसिफ शेख, माजी आमदार

Life in Malegaon resumed on Friday night after the bandh took a violent turn
नाशिक : प्रवाशांचा ‘खासगी’तून प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com