Nashik Millets Mahotsav 2023
Nashik Millets Mahotsav 2023esakal

Nashik News: ZPच्या मिलेट महोत्सवावर उष्माघाताचे सावट; खारघर घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचा अडसर

Nashik News : केंद्र सरकारने यंदाचे वर्ष भरडधान्य (मिलेट) वर्ष साजरा करण्याचे जाहीर केले असून याचाच निमित्त साधत जिल्हा परिषद प्रशासनाने कृषी विभागांतर्गत मिलेट महोत्सव भरविण्याची तयारी केली आहे. मात्र, या महोत्सवाला उष्माघात, उष्णतेची लाट चा फटका बसण्याची शक्यता आहे.

भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत १२ ते ५ वाजे दरम्यान असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर केले आहे.

त्यामुळे मिलेट महोत्सव रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Heat stroke at ZP millet festival Kharghar incident governments order obstructed Nashik News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Nashik Millets Mahotsav 2023
Nashik : समन्वय बैठकीत अधिकाऱ्यांना प्रोत्साहनाचे डोस; टंचाई, उष्णता लाट, BDOच्या नरेगा बहिष्काराकडे दुर्लक्ष

भरड धान्यांचा वापर वाढविण्यासाठी धान्यांचे महत्त्व ओळखून भारत सरकारने या धान्यांचे उत्पादन घेण्यास आणि त्यात वाढ करण्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सन २०२३ हे वर्ष भरड धान्यांचा वापर वाढविण्यासाठी भरड धान्य वर्ष (मिलेट) म्हणून जाहीर केले आहे.

याचे निमित्त साधत, जिल्हा परिषदेने ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने यंदा मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. मार्च महिन्यात महोत्सवाचे आयोजन करण्याची तयारी झाली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Nashik Millets Mahotsav 2023
Nashik Market Committee Election: उमेदवारांना चिन्ह वाटप करून यादी प्रसिद्ध! 15 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात

परंतू, यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा महोत्सव त्यावेळी झाला नाही. रद्द झालेला हा महोत्सवासाठी २८ एप्रिल ते २ मे दरम्यान शहरातील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर आयोजित केला होता.

२ मे रोजी पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होणार आहे. त्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणा व कृषी विभागाकडून जोरदार तयारी सुरू आहे. उष्णतेची लाटेच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव भरउन्हात कसा घ्यायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nashik Millets Mahotsav 2023
Nashik News : संचालकांना म्हणणं मांडण्याची संधी; पिंगळे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com