नाशिक- शहराच्या तापमानाने दोन दिवसात चाळिशी ओलांडली असून पुढील दोन दिवस तापमानाची तीव्रता अधिक राहणार आहे. तसेच मे मध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता महापालिकेच्या वतीने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व नाशिक रोड येथील हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी माहिती दिली.