Monsoon
sakal
नाशिक: जिल्ह्यातील देवळा, कळवण, बागलाण आणि मालेगावला शुक्रवारी (ता.१९) दुपारनंतर झालेल्या परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सुमारे तासभर झालेल्या या मुसळधार पावसाने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्यासह भाजीपाल्याच्या पिकांच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आल्या आहेत.