Nashik Monsoon
sakal
नाशिक: परतीच्या पावसाचा जिल्ह्यात धिंगाणा सुरूच असून, शनिवारी (ता. २७) येवला, मालेगाव आणि नांदगाव तालुक्याला अक्षरक्षः झोडपून काढले. बाणगाव (ता. नांदगाव) परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मक्यासह कांदा, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. येवला तालुक्यात तब्बल तीन तासांहून अधिक काळ, ५० ते ६० मिलिमीटरहून जास्त पाऊस झाल्याचा अंदाज आहे.