crop damage
sakal
नाशिक: जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख ९९ हजार ८०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. चार लाख २७ हजार ५८० शेतकरी बाधित झाले असून भरपाईसाठी ३२८ कोटी ६७ लाख २५ हजाराच्या अनुदानाची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला.