Monsoon
sakal
नाशिक: उत्तर महाराष्ट्रात २० तासांत झालेल्या अतिवृष्टीसदृश मुसळधार पावसाने खरिपाची दाणादाण उडाली आहे. मका, ज्वारी, कपाशी, केळी, कांदा, सोयाबीनसह भाताची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. बहुतांश पिके काढणीला आलेली असताना आलेल्या या संकटाने उरलीसुरली आशाही संपल्याने ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीची एकरी ५० हजारांची मदत जाहीर करा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.