Agriculture
sakal
नाशिक: जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडाला असून सोमवारी (ता.२२) मध्यरात्रीनंतर निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साचले असून अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेली उभी पीके वाहून गेली आहेत. पावसामुळे सुरगाणा, निफाडमधील काही गावांचा संपर्क तुटला असून लहानमोठे फरशीपूल पाण्याखाली गेल्याने नागरिक संतापले आहेत.