Monsoon
sakal
नाशिक: जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धूमशान घातले आहे. सोमवारी (ता. २२) मध्यरात्रीनंतर निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सुरगाणा तालुक्यांत मुसळधार आणि ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. अनेक गावांचा संपर्क तुटला; तर शेतकऱ्यांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेले. नागरी भागांत रस्ते व वसाहतींमध्ये पाणी शिरले. धरणांतून प्रचंड विसर्ग सुरू असून, नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी (ता. २४) यलो अलर्ट घोषित करण्यात आला.