नाशिक- शहरासह जिल्ह्यात शनिवारी (ता. ५) दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. हवामान विभागाने मुसळधारेचा इशारा दिला असून, घाटमाथ्याच्या परिसरात सोमवार (ता. ७)पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नाशिक शहरासाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला असून, पुढील तीन-चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.