Turkey Earthquake : भूकंपग्रस्तांसाठी मुस्लिम बांधवांकडून साडेबारा लाखांची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muslim brothers handing over the financial aid collected for the earthquake victims to senior religious leaders.

Turkey Earthquake : भूकंपग्रस्तांसाठी मुस्लिम बांधवांकडून साडेबारा लाखांची मदत

जुने नाशिक : तुर्की आणि सीरिया भूकंपग्रस्तांसाठी शहराच्या विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांकडून आर्थिक मदत जमा करण्यात आली होती. मुंबई येथील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत मोईनमिया यांच्याकडे हजरत सय्यद सादिक शाह हुसैनी रिलिफ कमिटीअंतर्गत जमा करण्यात आलेली १२ लाख ५१ हजारांची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. (Help of twelve half lakhs from Muslim brothers for Turkey Earthquake victims nashik news)

गेल्या काही दिवसात शहराच्या विविध मशिदीमध्ये १२ लाख ५१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. सोमवारी (ता.२०) सायंकाळी बडी दर्गा मैदानात मुंबई येथील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत मोईनमिया रजा ॲकॅडमीचे अध्यक्ष सईद नूरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

येत्या काही दिवसात ते स्वतः तुर्की येथे जाऊन तेथील भूकंपग्रस्तांना मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात येणार आहे. राज्यभरातून एक कोटीहून अधिक मदत देण्यात येणार असल्याचे हजरत मोईन मियाँ यांच्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

दरम्यान मृत झालेल्या भूकंपग्रस्तांना शांती लाभो, जखमी पीडितांचे संकट दूर हो. लवकरच पूर्ववत सामान्य परिस्थिती निर्माण होवो, अशी दुवा करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून आर्थिक मदत जमा करण्यासाठी कार्यरत असलेल्या तरुणांसह चिमुकल्याचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी बडी दर्गा येथे चादर अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. या वेळी शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब, हाफीज समीर कोकणी, हाजी झाकिर अन्सारी, कारी अफजल, हाफीज हसन, मौलाना मेहबूब आलम, वसीम पीरजादा, एजाज मकरानी यांच्यासह विविध मशीदचे मौलवी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.