esakal | उंटवाडी येथील प्राचीन वटवृक्षाला हेरिटेजचा दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

उंटवाडी येथील प्राचीन वटवृक्षाला हेरिटेजचा दर्जा

उंटवाडी येथील प्राचीन वटवृक्षाला हेरिटेजचा दर्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उंटवाडी परिसरातील दोनशे वर्षाहून अधिक प्राचीन असलेल्या महाकाय वटवृक्षाचे जतन व्हावे, म्हणून या वृक्षाला ‘हेरिटेज’ दर्जा मिळाला आहे. या मागणीसाठी उंटवाडीतील ग्रामस्थांनी वनविभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे या वटवृक्षाला हा दर्जा मिळाला आहे.

या वटवृक्षाची राज्याचे सामाजिक वनीकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक वाय. एल. पी. राव पाहणी करत शहर आणि जिल्ह्यातील प्राचीन महावृक्षाचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करून त्यांनाही हॅरिटेजचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

उंटवाडी गावाजवळील नासर्डी नदी पुलानजीक दोनशे वर्षाहून अधिक प्राचीन महावृक्ष आहे. या वटवृक्षाच्या दाट छायेखाली स्वयंभू म्हसोबा महाराजांचे मंदिर आहे. या ठिकाणी ब्रिटिशांच्या काळातही यात्रा भरत असल्याची शासन दप्तरी नोंदी आहेत. त्यामुळे हे वटवृक्ष अतिप्राचीन असल्याचे गावकऱ्यांचे मत आहे. शहरात विकासाच्या मुद्द्यावर ठिकठिकाणच्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याने हे प्राचीन वृक्षदेखील नामशेष होण्याची भीती उंटवाडीतील ग्रामस्थांना होती. यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत हा वटवृक्ष वाचविण्यासाठी वन विभाग, तसेच सामाजिक वनीकरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा वटवृक्ष वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. या महाकाय वटवृक्षाबाबतचे नक्की रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी वाय. एल. पी. राव यांनी भेट दिली.

या वेळी या वटवृक्षावर येणाऱ्या पक्षी, तसेच या वटवृक्षाचा घेर, झाडाच्या पारंब्याची लांबी आदींची माहिती जाणून घेतली. या वेळी राव यांचे श्री म्हसोबा महाराज देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मधुकर तिडके यांच्या हस्ते म्हसोबा महाराजांचे मानाचे वस्त्र देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक वनीकरण खात्याचे नाशिक विभागीय अधिकारी चंद्रकांत भारमल यांच्यासह अंबादास जगताप, सदाशिव नाईक, चंदू तिडके, दिनकर तिडके, केशव पाटील, यादव पाटील, संतोष कोठावळे, बाजीराव तिडके, विठ्ठल तिडके, विलास जगताप, राजेश गाढवे आदींसह उंटवाडीतील ज्येष्ठ ग्रामस्थ, तसेच म्हसोबा महाराज भक्त परिवार उपस्थित होता.

loading image
go to top