Nashik High Alert : लाल किल्ला स्फोटानंतर नाशिकमध्ये ‘हायअलर्ट’; काळाराम मंदिर, गोदाघाटावर अतिरिक्त बंदोबस्त!
Maharashtra on High Alert After Red Fort Blast : नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर राज्यभरात 'हायअलर्ट' जारी करण्यात आला असून, त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी (उदा. काळाराम मंदिर किंवा नोटप्रेस) अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.
नाशिक: राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेने महाराष्ट्रातही ‘हायअलर्ट’ जारी केला आहे. त्या अनुषंगाने नाशिक शहरातही पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.