Nashik Crime: हायटेक कॉपी बहादरास 4 दिवसांची पोलिस कोठडी

arrested
arrestedesakal
Updated on

Nashik Crime : राज्यातील विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे.

नाशिकमध्ये गुरूवार (ता.१७) घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. (High Tech Copy mstermind caught in talathi exam 4 Days Police Custody Nashik Crime)

परीक्षा केंद्राबाहेरून संशयित गणेश श्यामसिंग गुसिंगे (वय - २८, रा. मुक्काम सूजारपूरवाडी पोस्ट परसोडा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होते व त्यांच्या इतर साथीदारांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.१८) रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.

राज्यात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा गुरुवार (ता. १७) पासून सुरू झाली. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वेबईझी इन्फोटेक या ठिकाणी तलाठी भरती परीक्षा सुरू असताना केंद्रा बाहेरून संशयित गणेश गुसिंगे यास ताब्यात घेत त्याचेकडून एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन, हेडफोन आणि श्रवणयंत्र असे साहित्य जप्त करण्यात आले होते.

विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील काही प्रश्नांची फोटोही मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात येऊन म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असून या संशयिताच्या इतर दोन साथीदाराच्या शोधात पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे. संशयित गणेश गुसिंगे यास शुक्रवार (ता.१८) रोजी न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अहिरे करीत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

arrested
Crime Video : क्रूरतेचा कळस! मांजरीसोबत खेळतो या रागातून महिलेने कुत्र्यावर फेकले अँसिड

कठोर कारवाई ची मागणी

तलाठी भरती प्रक्रियेत लाखो परीक्षार्थी नी सहभाग घेतला आहे. या कॉपी प्रकरणाचा परिणाम यावर झाला तर जवळपास लाखो परीक्षार्थींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.

यातील दोषीवर कठोर कारवाई करावी. तसेच याकरिता कायदा बनविण्यात यावा जेणेकरून भविष्यात अशा परीक्षांमध्ये असे गैरप्रकार करण्याची कोणी हिम्मत होणार नाही अशी मागणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या काही युवकांनी केली आहे.

राज्यभरात होत असलेल्या तलाठी भरतीच्या परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. तर, काही विध्यार्थ्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.

"महाराष्ट्रात नोकरभरती घोटाळे सुरू असून, वन विभाग, मुंबई पोलीस भरतीचे पेपर फुटलेले आहेत. तलाठीची परीक्षा समोरच असून, पेपरफोड्या थांबविण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर पेपरफुटी कायदा करावा व परीक्षेचे शुल्क कमी करण्याची मागणी,” सरकार दरबारी मांडण्याची मागणी यावेळी विध्यार्थ्यांनी पटोले यांच्याकडे करण्यात आली होती.

संशयितांकडून मोठे जाळे उघड होण्याची शक्यता

महसूल विभागातील तलाठी पदाची सर्वात मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात नवनवीन पेपर फुटीचे प्रकार समोर येत आहे.

या संशयिताने कॉपी करण्यासाठी जी आधुनिक पद्धत वापरली आहे ते बघता या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभर या कॉपी बहाद्दरांचे नेटवर्क असल्याची शक्यता आहे

arrested
Phaltan Crime : पालकमंत्री, गृहमंत्र्यांवर आरोप करत ऑन कॅमेरा छाटलं बोट; फडणवीसांचे तात्काळ चौकशीचे आदेश पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com