Nashik : उच्च शिक्षितांचा विवाहात कौमार्य चाचणी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

उच्च शिक्षितांचा विवाहात कौमार्य चाचणी?

नाशिक : उच्च शिक्षित असलेल्या वधु-वरांचा रविवारी (ता. २१) नियोजित असलेला विवाह समारंभ वादाच्‍या भोवऱ्यात सापडला आहे. समाजातील प्रथेप्रमाणे जात पंचायतीच्‍या सांगण्यानुसार वधुची कौमार्य चाचणी केली जाणार असल्‍याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केला आहे. यासंदर्भात पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये होणाऱ्या या समारंभावर पोलिस व ‘अंनिस’चे लक्ष आहे.

या संदर्भात ‘अंनिस’कडे एक तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, ॲड. समीर शिंदे आदी कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्याची विनंती केली. मात्र वधू किंवा वर पक्षाकडून यासंदर्भात तक्रार करण्यात आलेली नाही. नियोजित वधू ही पीएच.डी.धारक, तर वरही उच्च शिक्षित असून, परदेशात नोकरीस आहे. त्‍याचे वडील शासकीय सेवेत होते. समाजात ही प्रथाच असल्‍याने वधू किंवा वर पक्षाकडून त्‍यास विरोध करण्यात आला नसल्‍याचे सांगण्यात आले.

loading image
go to top